देवळाली प्रवरा(वेबटीम) केंद्र शासनाच्या विधी व न्याय मंत्रालयाच्यावतीने राहुरी न्यायालयातील ॲड. प्रशांत मुसमाडे यांची नोटरी पब्लिकपदी निवड क...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
केंद्र शासनाच्या विधी व न्याय मंत्रालयाच्यावतीने राहुरी न्यायालयातील ॲड. प्रशांत मुसमाडे यांची नोटरी पब्लिकपदी निवड करण्यात आली आहे.
ॲड प्रशांत मुसमाडे हे राहुरी न्यायालयात गेल्या अनेक वर्षांपासून वकिली व्यवसायात कार्यरत आहेत. विविध बँका, वित्तिय संस्था, सामाजिक संघटना यावर कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत असून त्यांची राहुरी न्यायालयात 16 वर्षापासून वकील करत असून. विधी व न्याय मंत्रालयाकडून मुसमाडे यांची भारत सरकार नोटरीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
त्यांच्या नियुक्तीबद्दल माजी आ.चंद्रशेखर कदम यांनी सन्मान केला. यावेळी माजी नगराध्यक्ष गोरख मुसमाडे, बागायत पीक सोसायटीचे व्हा.चेअरमन मच्छीन्द्र कदम, संकल्प पतसंस्थेचे चेअरमन सुधाकर कदम, भाऊसाहेब वाळुंज, बबन डोंगरे, मुकुंद वेदपाठक आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत