देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे शिवसेना शिंदे गटाच्या शाखेचे उद्घाटन ३२ गाव तालुकाप्रमुख सुनील कराळे यांच्या नेतृ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे शिवसेना शिंदे गटाच्या शाखेचे उद्घाटन ३२ गाव तालुकाप्रमुख सुनील कराळे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले.
यावेळी शिवसेना दक्षिण जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यास शिवसेना उपजिल्हाप्रमुख अण्णा म्हसे, उपजिल्हाप्रमुख जयवंतराव पवार, शिवसेना अध्यात्मिक सेनेचे जिल्हाप्रमुखसंपत काका जाधव, शिवसेना शेतकरी संघटनेचे तालुकाप्रमुख किशो मोरे, नगर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शाम गोसावी महेश कन्स्ट्रक्शनचे राजेंद्र गायकवाड, संगम रसाळ, विक्रम फाटे आदिंसह टाकळीमिया व 32 गाव परिसरातील असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना ३२ गाव तालुकाप्रमुख सुनील कराळे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा.सदाशिव लोखंडे यांच्या माध्यमातून ३२ गावात मोठ्या काम विकास कामे करण्यात आली आहे. ३२ गावात गावागावात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मरक्षक आनंद दिघे यांचे विचार पोहोचविण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचे ते म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत