राहुरी(वेबटीम) राहुरी शहरातील पुरातन काळातील शुक्लेश्वर (महादेव) मंदिर चे जिर्णोद्धार करण्याचें काम मंदिर ट्रस्ट समिती व ग्रामस्थांनी लोकव...
राहुरी(वेबटीम)
राहुरी शहरातील पुरातन काळातील शुक्लेश्वर (महादेव) मंदिर चे जिर्णोद्धार करण्याचें काम मंदिर ट्रस्ट समिती व ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून हाती घेतले आहे या भव्यदिव्य अश्या कामांचा भूमिपूजन समारंभ बुधवार दिनांक २०)मार्च रोजी वरद विनायक संस्थांचे मठापती ह भ प उध्दव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे
बुधवार दिनांक (२०) मार्च (२०२४)रोजी सकाळी दहा वाजता ह भ प उध्दव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न होणार असून या वेळी देवळाली प्रवरा येथील ह भ प भाऊसाहेब महाराज वीर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे शहरातील गजबजलेल्या भागात असणारे शुक्लेश्वर मंदिर हे अत्यंत पुरातन काळापासून आहे शहरांसह जिल्यातील भाविकांची या ठिकाणी गर्दी असते या मंदिराचा जिर्णोद्धार व्हावा अशी अनेकांची इच्छा होती या कामासाठी मंदिर ट्रस्ट ची स्थापना करण्यात आली सर्वांच्या सहभागातून आणी लोकं वर्गणीतून काम करण्याचा निर्णय झाला शहराच्या वैभवात भर घालणारे मंदिर साकारणं आहे या कामासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येणार असून या कामासाठी सढळ हाताने मदत करण्याचें आवाहन देवस्थान ट्रस्ट चे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी केले आहे
बुधवारी होणाऱ्या भूमिपूजन समारभा वेळी ह भ प उध्दव महाराज मंडलिक नेवासेकर यांची प्रवचन सेवा होणार आहे तरी भाविकांनी, ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान मंदिर ट्रस्ट यांनी केले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत