राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील सेवा निवृत्त शिक्षक शंकर गावडे यांचे चिरंजीव अभिजित गावडे यांची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोग ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील सेवा निवृत्त शिक्षक शंकर गावडे यांचे चिरंजीव अभिजित गावडे यांची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत होणाऱ्या परिक्षेत ठाणे विभागात सहायक कृषी अधिकारी म्हणून नुकतीच निवड झाली आहे.
राहुरी फॅक्टरी येथील गावडे कुटुंबीय हे शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असते.
श्री.गावडे यांच्या या यशाबद्दल गुरूकुल वसाहत येथील पावन गणपती प्रतिष्ठानच्या वतीने गोपाल शिंदे, नंदकुमार काळाने यांनी त्यांचा सन्मान केला आहे.
गावडे यांच्या यशाबद्दल माजी खा.प्रसाद तनपुरे, माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे,बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे,सौ.उषाताई तनपुरे आदींनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत