कोपरगावात १ कोटी २० लाख रुपये निधीतुन सी.सी.टी.व्ही प्रणाली कामांचा शुभारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावात १ कोटी २० लाख रुपये निधीतुन सी.सी.टी.व्ही प्रणाली कामांचा शुभारंभ

कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शहरामध्ये  चौकांचौकामध्ये मध्ये  सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचबरोबर कोपरगाव शहरामध्ये कोल...

कोपरगाव(वेबटीम)



कोपरगाव शहरामध्ये  चौकांचौकामध्ये मध्ये  सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचबरोबर कोपरगाव शहरामध्ये कोल्ड स्टोरेज योगाभवन ओपन जिम साहित्य चौक सुशोभीकरण आदि कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे.

खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून कोपरगाव शहरातील वी.दा. सावरकर चौकात सी.सी.टीव्ही कॅमेरा यंत्रणा बसविण्याच्या कामाचा श्रीगणेशा १६ मार्च रोजी करण्यात आला या विकास कामाची अंदाजित रक्कम (१ कोटी २० लाख) रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे सदर प्रणाली कोपरगाव शहरात गतीने प्रस्थापित करण्यात येणार आहे यावेळी युवा नेते प्रशांत सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. 


या प्रसंगी जिल्हा प्रमुख मनील नरोडे, जिल्हा प्रमुख नितीन आवताडे, तालुका प्रमुख रावसाहेब अण्णा  थोरात, सरपंच संजय गुरसाळ,अभिषेक आव्हाड शहरप्रमुख,अक्षय जाधव, तसेच शिवसेनेचे सर्व महिला पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत