इफकोच्या जनरल बॉडी सदस्यपदी नकुल कडू - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

इफकोच्या जनरल बॉडी सदस्यपदी नकुल कडू

  राहुरी(प्रतिनिधी) नामांकित इफको या सहकारी संस्थेच्या अहमदनगर, धुळे, नंदुरबार या विभागाच्या जनरल बॉडी सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये ...

 राहुरी(प्रतिनिधी)



नामांकित इफको या सहकारी संस्थेच्या अहमदनगर, धुळे, नंदुरबार या विभागाच्या जनरल बॉडी सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये  लोकसेवा मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीचे अध्यक्ष नकुल विलासराव कडू यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 


नुकत्याच पार पडलेल्या या निवडणुकीत कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या पाठिंब्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारीम्हणून तुषार गोरड यांनी इफकोकडून कामकाज पाहिले.नकुल कडू यांच्या या निवडीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इफको व एनसीयुआयचे अध्यक्ष दिलीप संघानी, इफकोचे एम. डी. डॉ. यु. एस. अवस्थी, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,आ. जयकुमार रावल, आ. आशुतोष काळे, आ. प्राजक्त तनपुरे, आ. निलेश लंके, आ. राम शिंदे, आ. शंकरराव गडाख, चंद्रशेखर कदम, मल्टीस्टेट फेडरेशनचे चेअरमन सुरेश वाबळे व इफकोचे स्टेट मॅनेजर श्री. तिजारे आदिंनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत