राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- येत्या १३ मे रोजी होणारी शिर्डी व अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आरपीआय आंबेडकर पक्ष पूर्णताकदीनिशी स्वबळावर नि...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
येत्या १३ मे रोजी होणारी शिर्डी व अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आरपीआय आंबेडकर पक्ष पूर्णताकदीनिशी स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे प्रतिपादन आरपीआय आंबेडकर पक्ष जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी म्हंटले आहे.
याबाबत बोलताना जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे म्हणाले की, शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीव असून महाविकास आघाडी व महायुतीने आजपर्यंत नेहमीच बौद्ध समाजाच्या उमेदवाराला संधी नाही. नेहमीच बौद्ध समाजावर अन्याय केला जातो. त्यामुळं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वांना विश्वासात घेऊन शिर्डी लोकसभेबरोबर दक्षिण अहमदनगर मतदारसंघात आरपीआय आंबेडकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र उमेदवार देऊन दोन्ही जागा स्वबळावर लढणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी जिल्हा सचिव राजन ब्राम्हणे, रोहित आव्हाड, पप्पू गोडगे, पूजा सोनवणे , नाना वाघमारे, किशोर वाघमारे, हरीश आल्हाट, संदीप वाघमारे, शशिकांत दारोळे व सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत