कोपरगावच्या तहसिलदरांना शिवीगाळ करत दमबाजी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावच्या तहसिलदरांना शिवीगाळ करत दमबाजी

कोपरगाव(वेबटीम)  कोपरगांव येथील तहसीलदार भोसले यांनी अवैध रित्या वाळू घेऊन जाणाऱ्या एक वाहनास पकडे असता त्याचा राग मनात धरून वाळू माफियांकडू...

कोपरगाव(वेबटीम)



 कोपरगांव येथील तहसीलदार भोसले यांनी अवैध रित्या वाळू घेऊन जाणाऱ्या एक वाहनास पकडे असता त्याचा राग मनात धरून वाळू माफियांकडून तहसीलदार यांना शिवीगाळ व दमबाजी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावरून वळूमाफियाची मुजोरी वाढलेली दिसून येत आहे. तहसीलदार यांनाचं जर वाळू तस्कर शिवीगाळ व दमबाजी करत असतील तर पोलीस प्रशासनाने याचे गांभीर्य ओळखून वाळू माफियांवर अंकुश ठेवण्याची नित्यंत गरज आहे.


दिनांक २४ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक प्रतिबंध घालून त्यावर कारवाई करण्याकामे पथक गस्तीवर असताना त्यांना  कुंभारी फॉरेस्ट मधून रोडला हिंगणे कडे जातांना टाटा कंपनीचा टेम्पो त्यात वाळू भरून जात असताना त्याला अडवून अवैध रित्या वाळू वाहतूक करतांना आढळून आल्याने कारवाई करणे कमी कोपरगांव तहसील कार्यालय येथे घेऊन आले असता.आरोपी यांनी त्यांच्या साथीदार यांना बोलून पथका सोबत हुज्जत घालत " तुम्ही पैसे घेत नाही का,तुम्ही आमचा वाळू वाहतूक करणार टेम्पो का तहसील कार्यालयात आणला तो लगेच सोडवा नाहीतर तुम्हाला इथे नोकरी करून देणार नाही " अशी धमकी देत दमबाजी केली.त्याच बरोबर पथकांनी आपले वरिष्ठ अधिकारी तहसीलदार भोसले यांना संपर्क साधून कोपरगांव तहसील कार्यालय येथे बोलावले असता तहसीलदार यांना देखील वाळू माफियांनी शिवीगाळ करत दमबाजी केली. याची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटना स्थळी धाव घेत गर्दी पांगवली.


घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार भोसले आणि पथकाने पोलीस ठाण्यात रात्री उशिरा वाळू माफियांवर गुन्हा दाखल केला असून त्या प्रमाणे बाबासाहेब शिवाजी जाधव, अझर इस्मौद्दिने शेख, तुषार दीपक दळे यांच्याविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वी कलम ३७९,३५३,३३२,५०४,५०६ ३४ प्रमाणे पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८० प्रमाणे ३/१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वाळू माफियांविरुद्ध कारवाई करणाऱ्या तहसीलदारांनाच शिवीगाळ व दमबाजी करण्यात येत असेल तर पोलीस प्रशासनाने याची गांभीर्यने दाखल घ्यायला हवी अशी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत