गुहा येथे ३० व ३१ मार्चला कानिफनाथ महाराज यात्रा उत्सव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गुहा येथे ३० व ३१ मार्चला कानिफनाथ महाराज यात्रा उत्सव

राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गुहा येथील श्री.कानिफनाथ महाराज यात्रा उत्सवनिमित्ताने  शनिवार ३० ते रविवार ३१ मार्च या कालावधीत विविध धार...

राहुरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील गुहा येथील श्री.कानिफनाथ महाराज यात्रा उत्सवनिमित्ताने  शनिवार ३० ते रविवार ३१ मार्च या कालावधीत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


 श्री.कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्यावतीने यंदाच्या यात्रा उत्सवाची पूर्ण तयारी करत करण्यात आली आहे.


 शनिवार ३० मार्च रोजी सकाळी ८ वा. कावड/गंगाजल पूजन व कावड मिरवणूक संपन्न होणार आहे. त्यानंतर ९ वा.गंगास्नान व  महापंचामृत अभिषेक व होम हवन  तसेच सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत काठी व छबिना मिरवणूक व रात्री ९ ते ११ वा.ऑर्केस्ट्रा कार्यक्रम संपन्न होणार आहे. रविवार ३१ मार्च रोजी सायंकाळी ४ वा.कुस्त्यांचा जंगी हंगामा होणार आहे. यात्रा उत्सव ठिकाणी पाळणे, खेळणी व इतर दुकाने थाटली जाणार आहे.

 तरी भाविकांनी कानिफनाथ दर्शन व यात्रा उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट, गुहा यांनी केले आहे.


 यात्रा उत्सव काळात गुहा येथे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत