राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथे दावल मालिक बाबा यात्रा(उरूस) निमित्त गुरुवार २८ मार्च ते शनिवार ३० मार्च या कालावधीत वि...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथे दावल मालिक बाबा यात्रा(उरूस) निमित्त गुरुवार २८ मार्च ते शनिवार ३० मार्च या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
चिंचविहिरे येथे दरवर्षी दावल मालिक यात्रा उत्सव तथा उरूस कार्यक्रमास सर्व भाविक भक्त मोठ्या आनंदाने सहभागी होतात. गुरूवार २८ मार्च रोजी रात्री ९ वाजता संदल मिरवणूक त्यानंतर कावड गंगाजल मिरवणूक तसेच शुक्रवार २९ मार्च रोजी रात्री ८ ते ९ भव्य छबिना मिरवणूक व फटाक्यांची आतिषबाजी व त्यानंतर ९ आनंद महाजन(जळगावकर) निर्मित लोकनाट्य तमाशा संपन्न होणार आहे. शनिवार ३० मार्च रोजी सकाळी ९ लावणी हजेरी कार्यक्रम, दुपारी २ वा भव्य घोडाबैल टांगा शर्यत संपन्न होणार आहे.
तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन यात्रा कमिटी अध्यक्ष बाबासाहेब पठारे, उपाध्यक्ष विजय शिंदे, सचिव बबन धामोरे, बाळासाहेब नरोडे, खजिनदार शरद पानसंबळ, मारुती चोथे, संतोष पवार तसेच मार्गदर्शक दगडू गीते, शब्बीर पठाण, बाळासाहेब गिते, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुधीर झांबरे, पोलीस पाटील हिराबाई नरोडे यांच्यासह सरपंच , उपसरपंच व सदस्य तसेच माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन, माजी पदाधिकारी व संचालक तसेच समस्त ग्रामस्थ चिंचविहिरे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत