पानेगांव(वेबटीम) विचार अंगिकारा जिवन तेजोमय झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास प्राईड अॅकेडमीच्या अध्यक्षा वंदना मुरकुटे यांनी तिथीनुसार श...
पानेगांव(वेबटीम)
विचार अंगिकारा जिवन तेजोमय झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास प्राईड अॅकेडमीच्या अध्यक्षा वंदना मुरकुटे यांनी तिथीनुसार शिवजयंती पानेगांव (ता. नेवासे) अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांची पूजन तसेच शिवरायांची आरती त्यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना बरोबर घेवून स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे विचार आज जगासाठी प्रेरणादायी आहे. शिवरायांचे विचार अंगिकारा जिवन तेजोमय झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पानेगांव आता मला माहेरवाशीण सारखं वाटतं नामदार शंकरराव गडाख तसेच लोकनेते सुनिलभाऊ गडाख पाटील यांचा मार्गदर्शनाखाली माजी लोकनियुक्त सरपंच संजय पाटील जंगले यांनी येथे केलेला विकास डिजिटल प्राथमिक शाळा, भव्यदिव्य ग्रामपंचायत कार्यालय भक्त निवास, मोक्षधाम, येथे असणार निसर्गरम्य परिसर, गावातील असणारे मंदिर येथे हि भेटी देऊन दर्शन मुरकुटे यांनी दर्शन घेतले. मोठ्या प्रमाणावर वाढलेली वृक्ष मोठा आनंद या निमित्ताने होतो.
यावेळी प्राईड अॅकेडमीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवन पटावरील हुबेहूब कला सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांचा वेशभूषा,भावपण कलाकृती जणू शिवराज्य साक्षात डोळ्यापुढं उभा राहिलं या निमित्ताने आनेकांचा डोळ्यांचा कडा पाणवल्या होत्या.
यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ निकीता भोसले, उपसरपंच दत्तात्रय घोलप,माजी उपसरपंच रामराजे जंगले,उमेद फाऊंडेशन अध्यक्ष बी वाय वाघ,संजय पवार, गणेश जंगले,बाबराजे गुडधे, संकेत गुडधे, विशाल जंगले, बाबासाहेब शेंडगे, ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे,रघूनाथ जंगले, भाऊसाहेब काकडे, मच्छिंद्र जंगले, बाळासाहेब जंगले डॉ काकडे,विजय जंगले, बबनराव जंगले राजेंद्र जंगले साहेबराव जंगले छत्रपती प्रतिष्ठानचे पदाधिकारी पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील आदींसह परीसरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत