देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री त्रिंबकराज स्वामी पायी दिंडी सोहळा समितीच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्या...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री त्रिंबकराज स्वामी पायी दिंडी सोहळा समितीच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील जयदर येथे ६ ते १० एप्रिल या कालावधीत बालबोध ग्रंथ पारायण सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह व वैष्णव मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
५ एप्रिल २०२४ रोजी राजयोगी श्री समर्थ त्रिंबकराज स्वामी मंदिर श्री क्षेत्र देवळाली प्रवरा येथून भाविक तीर्थक्षेत्र वणी व व जयदरकडे सकाळी ९ वाजता मार्गस्थ होणार आहे. सदर कार्यक्रमास जाण्यासाठी व येण्यासाठी अल्पदरात बस व्यवस्था करण्यात आली आहे.
तर, दि. ६ एप्रिल २०२४ रोजी देवळाली प्रवरा येथील हभप सुभाष महाराज विधाटे व हभप बाबा महाराज मोरे यांची किर्तनरुपी सेवा होणार आहे.
तसेच रविवार दि. ७ एप्रिल २०२४ रोजी हभप हिराताई मोकाटे, हभप निवृती महाराज काळे (विजय नगर), दि. ८ एप्रिल २०२४ रोजी हभप चैतन्य महाराज मापारे, हभप भगवान महाराज मोरे (देहूकर), गुढिपाडव्यानिमित्त दि. ९ एप्रिल २०२४ रोजी हभप सोमनाथ महाराज माने व हभप नामदेव महाराज जाधव (शास्त्री), दि. १० एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत हभप महंत उद्धवजी महाराज मंडलीक (नेवासेकर) यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने सांगता होणार आहे.
दि. ९ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते ग्रंथ मिरवणूक व ग्राम प्रदक्षिणा संपन्न होणार हवं.
नाशिक जिल्ह्यातील जयदर येथील सप्ताहाला येण्यासाठी बाबासाहेब सांबारे (9921009760), विठ्ठल टिक्कल (9890635237), हभप नामदेव महाराज शास्त्री (9975028372), हभप बाबा महाराज मोरे (9881544565), हभप सुभाष महाराज विधाटे (7666292262) यांसह आदींना संपर्क करावा, असेही आवाहन श्री त्रिंबकराज स्वामी पायी दिंडी समितीच्यावतीने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत