देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा उत्सवास उत्साहात प्रारंभ झाला असून यात्रा उत्सवानिमित्त विविध ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथील समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा उत्सवास उत्साहात प्रारंभ झाला असून यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज शुक्रवार दिनांक ५ एप्रिल मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता देवळाली प्रवरा बाजारतळावर महाराष्ट्रातील युवकवीर नामांकित कीर्तनकार व विनोदाचार्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांचे कीर्तन संपन्न होणार आहे.त्यांना देवळाली प्रवरा परिसरातील गायक, पखवाज वादक व टाळकरी व वारकरी तसेच नारायणगिरी महाराज आश्रम, सुरेगाव येथील वारकरी विद्यार्थ्यांची साथसंगत लाभणार आहे.
कीर्तन श्रवणासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्यने उपस्थित रहावे असे आवाहन श्री.समर्थ बाबुराव महाराज यात्रा कमिटीने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत