राहुरी(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या दिलीप भोंडवे या मजुराच्या मुलाने एमबीबीएस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊ...
राहुरी(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथील शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या दिलीप भोंडवे या मजुराच्या मुलाने एमबीबीएस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन नेत्र दीपक यश प्राप्त केलेले आहे तुषार दिलीप भोंडवे हे एमबीबीएस मध्ये प्रथम श्रेणीमध्ये पास झाले आहेत.
याबाबत माहिती अशी की, देवळाली प्रवरा येथे दिलीप भोंडवे हे शेतमजूर म्हणून आपल्या पत्नीसह काबाडकष्ट करत असतात स्वतः कमी शिकलेल्या असले तरी आपल्या मुलाने उच्चशिक्षित व्हावे असा पहिल्यापासून या पती-पत्नीने उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला होता. त्यास त्यांचा मुलगा तुषार यांनी देखील साथ देत आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास केला आणि तुषार दिलीप भोंडवे हा महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स (नाशिक) हिवाळी २०२३ यांनी नुकताच एमबीबीएस अंतिम वर्षाचा निकाल घोषित केला .यात डॉ. तुषार दिलीप भोंडवे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला.त्यांनी मुंबई येथील नायर हॉस्पिटल या मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे .
तुषारच्या वडिलांचे शिक्षण नववीपर्यंत आईचे शिक्षण आठवीपर्यंत मात्र आई-वडिलांच्या कष्टाची चीज व्हावे म्हणून तुषार नेहमीच अभ्यासामध्ये मग्न राहिला देवळाली प्रवरा येथेच त्याने प्राथमिक शिक्षण घेऊन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण देखील देवळाली प्रवरा येथेच घेतले देवळाली प्रवरा येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज या विद्यालयात तो बारावी इयत्तेत विद्यालयात दुसरा आला आणि पुढे त्याला एमबीबीएसला ऍडमिशन मिळाले आणि त्यांनी ही परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये पास करून आपल्या वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. अगदी गरीब परिस्थितीमध्ये तुषार ने हे यश प्राप्त केले असून त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत तुषार ने सांगितले की,या यशापर्यंत पोहचण्यासाठी माझ्या आईवडिलांनी खूप मोठा हातभार आहे ते जास्त शिकले नाही पण मला त्यांनी डॉक्टर बनवले याचा खूप अभिमान आहे. मी आज जो काही आहे ते माझ्या आई-वडिलांच्या कष्टाचे फळ आहे असे मला वाटते.
याबाबत बोलताना तुषारचे वडील दिलीप भोंडवे यांनी सांगितले की माझ्या मुलाला गरिबीची जाण असल्याने त्याने आम्हाला कधीही जास्तीचा आर्थिक त्रास दिला नाही जो खर्च येईल तो आम्ही मोलमजुरी मधून भागवत त्याला शिक्षणासाठी पैसा दिला त्याने गरिबीची जाण असल्यामुळेच हे यश प्राप्त केले त्याचा आम्हाला अभिमान आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत