आंबी(वेबटीम) शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या राहुरी तालुका उत्तर कक्षप्रमुखपदी आंबी येथील अशोक चांगदेव साळुंके, उपप्रमुख कक्षपदी सर्जेराव होन...
आंबी(वेबटीम)
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या राहुरी तालुका उत्तर कक्षप्रमुखपदी आंबी येथील अशोक चांगदेव साळुंके, उपप्रमुख कक्षपदी सर्जेराव होन यांची निवड करण्यात आली.
यावेळी राज्याचे मदत कक्षाचे प्रमुख राम राऊत यांनी अशोक साळुंके यांना निवडीचे पत्र दिले. यावेळी दवणगांव येथील सुनिल खपके, आंबी शाखा प्रमुख बाबासाहेब रोडे, उपप्रमुख रमेश फुलमाळी उपस्थीत होते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार महाराष्ट्र राज्य कक्ष प्रमुख राम राऊत, संपर्क प्रमुख रणजीत परदेशी, संपर्क शहर प्रमुख गंगाधर सांगळे, नगर शहर प्रमुख रोहीत लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड पार पडली.
शिवसेना मदत कक्षाच्या वतीने गोर -गरीब गरजू व आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मदाय रुग्णालयात राखीव खाटा उपलब्ध करुन देणे, निकषात बसलेल्या गरीब रुग्णांना पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दराता शस्त्रक्रिया करण्यात संदर्भात मदत तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणेसाठी योग्य मार्गदर्शन देऊन तत्पर राहावे असे निवडीच्या पत्रात म्हंटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत