राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील ताहाराबाद शिवारात जमीन असलेल्या व राहुरी फॅक्टरी येथील रहिवासी असलेल्या सेवानिवृत्त महिला प्राचार...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील ताहाराबाद शिवारात जमीन असलेल्या व राहुरी फॅक्टरी येथील रहिवासी असलेल्या सेवानिवृत्त महिला प्राचार्यास तुमची पाईप लाइन फोडून टाकुन माझ्या शेतीला पाणी देणार आहे,जर तू मला काही विरोध केला तर तुझे हातपाय तोडून टाकीन अशी धमकी दिलेल्या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत राहुरी पोलीसात दिलेल्या तक्रारीत लिलावती विवेकानंद जाधव(वय-६२, रा.राहुरी फॅक्टरी) यांनी म्हंटले की, ४ मार्च रोजी सायंकाळी ताहाराबाद येथील शिवाजी औटी, बाबासाहेब श्रीरंग नाईकवाडे, सुभाष कारभारी औटी, कारभारी कोंडीबा औटी यांनी फिर्यादी लिलावती जाधव यांना फोन करून तुमची पाईप लाइन फोडून टाकुन माझ्या शेतीला पाणी देणार आहे,जर तू मला काही विरोध केला तर तुझे हातपाय तोडून टाकीन अशी धमकी दिली.
याबाबत लिलावती जाधव यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल जानकीराम खेमनर हे करीत आहे.
सदर आरोपींकडून मला त्रास होत असून राहुरी पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा अशी मागणी लिलावती जाधव यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत