कोपरगाव(वेबटीम) वेगाची मर्यादा न पाळता वाहने दामटणाऱ्या वाहनचालकांना आवर घालण्यासाठी आणि होणारे अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक बसविले ज...
कोपरगाव(वेबटीम)
वेगाची मर्यादा न पाळता वाहने दामटणाऱ्या वाहनचालकांना आवर घालण्यासाठी आणि होणारे अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक बसविले जातात.कोपरगाव नगर परिषदेच्या माध्यमातून देखील शहरात वेगवेळ्या भागात गत वर्षी रबरी गतिरोधक
बसवण्यात आले परंतु अवघ्या काही दिवसातच या गतिरोधकांची अतिशय दुर्दशा झालेले दिसत आहे.
पालिकेच्या नफा खर्चातून सुमारे ४ लाख ६० हजारांचे हे नवीन रबरी गतिरोधक बसवण्यात आले होते. शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी हे गतिरोधक बसविले होते परंतु सध्या हे
गतिरोधक असून पण काही उपयोगाचे नसल्याचे दिसत आहे. शहरात ४ लाख ६० हजर रुपयाचे किमतीचे एकूण किती गतिरोधक बसविले गेले आहे या संदर्भातील माहिती देण्यासाठी पालिकेच्या बांधकाम विभागाकडून टाळाटाळ करण्यात येत असून गतिरोधक बसवणाऱ्या ठेकेदार व पालिका कर्मचारी यांनी मिळून झालेल्या कामात भ्रष्टाचार केल्याची शंका ही उपस्थित होते आहे.
त्याच बरोबर नवीन झालेल्या रस्त्यावरील गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्यामुळे वाहनचालकांना त्याचा पटकन अंदाज येत नाही आहे . यामुळे छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना देखील घडता आहे.
गतिरोधकाची उंचीही प्रमाणित उंचीपेक्षा अधिक असल्याने दुचाकीस्वारांचे हाल होतात.
यामुळे गतिरोधकांसाठी आखून दिलेले नियमाची पायमल्ली पालिके मार्फत केली जात आहे.
पालिकेला नगराध्यक्ष नसल्यामुळे सर्व अधिकार मुख्याधिकारी याच्या कडे असल्यामुळे पालिका प्रशासन अजून किती नफा खर्च वाया घालवणार असा सवाल नागरिकांना पडला आहे.
सदर खराब झालेल्या गतिरोधकांच्या ठिकाणी नवीन गतिरोधक पालिका प्रशासन बसवेल का नाही ?....
गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारतील की नाही ?..... की...मोठा अपघात घडल्यावरच पालिका प्रशासन कामाला सुरुवात करेल की काय असा सवाल स्थानिक नागरिक करतांना दिसत आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत