राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथे बस स्टँड शेड नसल्यामुळे तळपत्या उन्हामध्ये प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत होती जगदंबा मंडपचे नाम...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथे बस स्टँड शेड नसल्यामुळे तळपत्या उन्हामध्ये प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत होती जगदंबा मंडपचे नामदेव खरात यांनी विनामूल्य मंडप शेड उभारून प्रवाशांना दिलासा दिला आहे.
सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असून राहुरी फॅक्टरी येथ बस स्टँड शेड उपलब्ध नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने देवळाली प्रवरा येथील जगदंबा मंडपचे नामदेव खरात या मंडप व्यावसायिकाने विनामूल्य मंडप कापड टाकून सावली तयार करून प्रवाशांना दिलासा दिला आहे.
सामाजिक जाणिवेच्या भूमिकेतून खरात यांनी केलेल्या या कार्याची चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी दखल घेऊन नामदेव खरात यांचा सन्मान केला. यावेळी शिवसेना अध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष संपत महाराज जाधव , सुधाकर कदम आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत