राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील कराळेवाडी परिसरातील साईनगर येथे कै.ह.भ.प प्रकाश रंगनाथ शेळके(टेलर्स) यांच्या प्रथम पुण्यस्मरणा...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील कराळेवाडी परिसरातील साईनगर येथे कै.ह.भ.प प्रकाश रंगनाथ शेळके(टेलर्स) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज शनिवार ९ मार्च ते शनिवार १६ मार्च २०२४ या कालावधीत सायंकाळी ६.३० वा. ताहाराबाद येथील संत कवी महिपती देवस्थानचे मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेची सांगता शनिवार १६ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत अर्जुन महाराज तनपुरे यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे.
तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शेळके परिवरच व परिसरातील मित्र मंडळाने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत