कोपरगांव(प्रतिनिधी) सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी यासाठी अजित पवार गटाचे कोपरगाव येथील आमदारआशुतोष काळे यांनी साईबाबा संस्...
कोपरगांव(प्रतिनिधी)
सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी यासाठी अजित पवार गटाचे कोपरगाव येथील आमदारआशुतोष काळे यांनी साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांना धमकावल्याचे प्रकरण समोर आले आहे. याचिका मागे घ्या, नाहीतर इडी मागे,लावेन अशी त्यांनी धमकी दिल्याचा आरोप माजी विश्वस्तांनी केला असून एकच खळबळ उडाली आहे.
महाविकास आघाडीने 2021 साली साईमंदिर विश्वस्त आणि अध्यक्षांची निवड केली होती.मात्र या निवडीला हायकोर्टाने स्थगिती दिल्यानेतात्कालिन अध्यक्ष आशुतोष काळे यांच्यासह विश्वस्तांनी सुप्रिम कोर्टात ३ याचिका दाखल करत आव्हान दिले आहे. या प्रकरणाचा लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आता अजित पवारांसोबत सत्तेत सामील झालेल्या आमदार आशुतोष काळे यांनीच विश्वस्तांना फोनवरून धमकावत याचिका मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप माजी विश्वस्तांनी पत्रकार परिषद घेत प्रसार माध्यमांना सांगितले आहे.
माजी अध्यक्ष आशुतोष काळे यांनी विश्वस्त सुहास आहेर, सचिन गुजर, अविनाश दंडवते यांना फोन करत याचीका मागे घेण्यासाठी दबाव टाकत धमकी दिल्याचा विश्वस्तांनी आरोप केला आहे. सरकारमधून याचिका मागे घेण्याचा दबाव येत असल्याचं सांगत याचिका मागे घेतली नाही तर तुमच्या मागे ईडी लावली जाईल. तुमचे राजकीय भवितव्य धोक्यात आणले जाईल. तुमच्या मागे हात धुवुन लागू या प्रकारे आशुतोष काळे यांनी धमकावल्याचा खळबळजनक आरोप विश्वस्तांनी केला आहे.
या आरोपाबाबत आमदार आशुतोष काळे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समजू शकली नसून आमदार काळे या आरोपांवर काय प्रतिक्रिया देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत