राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सत्यजित कदम फाउंडेशनच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सत्यजित कदम फाउंडेशनच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम रविवार १० मार्च रोजी आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमास महिला व युवतींनी जास्तीत जास्त संख्यने उपस्थित रहावे असे आवाहन प्रीती सत्यजित कदम यांनी केले आहे.
रविवार १० मार्च रोजी दुपारी ३ वाजता राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून महिलांची भव्य टू व्हीलर रॅली काढण्यात येणार आहे.त्यानंतर सायंकाळी ६ वाजता राहुरी फॅक्टरी येथील वृंदावन कॉलनीत महिलांचे विशेष ढोल पथक सादरीकरण त्यानंतर उत्कृष्ट सासू-सून पुरस्कार प्रदान सोहळा व सायंकाळी ७ नंतर महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन सत्यजित कदम फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत