कोपरगाव(वेबटीम) आज दि. 06/03/2024 रोजी Dysp शिरीष वमने यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात ग...
कोपरगाव(वेबटीम)
आज दि. 06/03/2024 रोजी Dysp शिरीष वमने यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात गोदावरी नदीपात्रात गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कोपरगाव तालुक्यातील चासनळी परिसरातील गोदावरी नदी पात्रातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू असा एकूण 1,46,000हजार रुपयांचा मुद्देमालाचा जागीच नाश करण्यात आला. व आरोपी नामे1 शिवाजी संपत माळी, 2) मिथुन छगन माळी 3)’विशाल कृष्णा दळे सर्व रा माणकेश्वर नगर, चासनळी ता.कोपरगाव वरील सर्व आरोपींविरुद्ध कोपरगाव तालुका पो. स्टे. येथे 77/2024 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
अचानक केलेल्या या कारवाईमुळे कोपरगाव तालुक्यातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर मा. वैभव कलूबर्मे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांचे मार्गदर्शनाखाली Dysp शिरीष वमने शिर्डी HC इरफान शेख HC अशोक शिंदे, HC संदीप बोटे PC दिनेश कांबळे,PN शाम जाधव चालक Pc ज्ञानेश्वर गांगुर्डे आदींनी केली.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत