अस्वस्थतेने प्रवरेचा आदेश होताच बोलके बाहुले सक्रिय होतात - - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अस्वस्थतेने प्रवरेचा आदेश होताच बोलके बाहुले सक्रिय होतात -

 कोपरगाव(वेबटीम) दलित वस्ती निधीत दूजाभाव केला म्हणून दलीत विरोधी पालकमंत्री विखे आणि आमदार काळे यांना जाब विचारणा झाली तर त्याचे दुःख विजयर...

 कोपरगाव(वेबटीम)



दलित वस्ती निधीत दूजाभाव केला म्हणून दलीत विरोधी पालकमंत्री विखे आणि आमदार काळे यांना जाब विचारणा झाली तर त्याचे दुःख विजयराव वहाडणे यांना का झाले असावे ? तर त्यामागे विखे यांनी दलित वस्ती निधी बद्दल झालेल्या मोर्चाची धास्ती घेतली आहे.विवेकभैय्या कोल्हे जे जनसामान्यांच्या हक्कासाठी लढत आहे याचा जणू धसका विखे यांनी घेतल्याने त्यांना तकलादू आधार घ्यावे लागत असल्याची बोचरी टीका आंबेडकरी नेते जितेंद्र रणशुर यांनी केली आहे.


काही काळ आधी ना.राधाकृष्ण विखे यांच्या तालुक्यात दलितांवर हल्ला होतो,जातिय वाद आणि धार्मिक तेढ होईल असे प्रकार घडवले जातात.इतर वेळी नेहमीच ठराविक एका जातीला दुय्यम दाखवून आपले राजकीय मत गोळा करण्यात मात्र हे लोक पुढे आहेत.दलीत वस्ती निधीत दूजाभाव का करत आहेत तर त्यांना मनातून आमचा तिरस्कार आहे का ? असेच आम्हाला पावलो पावली जाणवले आहे.सगळे माझ्या दावणीला पाहिजे हा त्यांचा मनसुबा राहता तालुक्याने ओळखला आहे.


मतदानावेळी दलीत समाजाची मते पैसे देऊन विकत घेऊ हा भ्रम आणि विचार डोक्यात पण येऊ देऊ नका.आम्ही स्वाभिमानी दलीत बांधव सर्व काही सत्य जाणून आहेत. दूजाभावाने केवळ कोल्हेंकडे सत्ता असणाऱ्या ग्रामपंचायत आहेत म्हणून विखे आणि काळे यांनी निधी दिला नाही त्याचे परिणाम त्यांना भविष्यात आमचा समाज दाखवून देणार आहे.


नको त्या वेळी आपले राजकिय महत्व वाढवून घेण्यासाठी काम करणारे अनेक लोक विखे यांनी दावणीला बांधले आहेत.त्यातच विजय वहाडणे यांचे सर्व कारनामे लोकांना माहीत आहे.फक्त लोणीचा बाहुला म्हणून तुम्हाला काम मिळाले आहे.तुमची ती नोकरी वाचवण्यासाठी तुम्हाला कोल्हेंवर टीका करण्यास वाड्यावरून आदेश झाला असेल त्यामुळे तुमची काही चूक नाही तुम्हाला दिवस भरावा लागतो असे खडेबोल वहाडणे यांनाही रणशूर यांनी सुनावले आहे.


जे वहाडणे कोल्हे यांनी कामे केले नाहीत म्हणतात तर मग ज्या गोकुळनगरी पुलाचे उद्घाटन तुम्ही केले तो पुल असो की नगरपालिका इमारत,पंचायत समिती इमारत,पोलीस स्टेशन,बसस्थानक,बाजार ओटे,वाचनालय,फायर स्टेशन ही कामे कुणाची आणि फोटो सेशन कुणी केले हे जनतेला दिसले आहे.२८ कामाचा तुम्हाला मलिदा हवा म्हणून हट्ट सुरू असलेली पेव्हर ब्लॉकची वस्तुस्थिती जर समोर आली नसती तर जनतेचे ३ कोटी रुपये वाचले नसते. त्यातून नंतर इतर कामे झाली ती झाली नसती.राहिला विषय नगरपालिका कामांचा तर कोल्हे गटाने केलेले सर्व ठराव होते आणि सर्व नगरसेवकांनी केलेला पाठपुरावा यामुळे निधी मिळाला तो तुम्हाला मलिदा मिळाला नाही की आरोप करने हा प्रकार सर्वांना ठाऊक होता.जरा तरी मनाचा कमकुवतपणा अशा वेळी दिसू देऊ नका की आपला एक तरुण स्वाभिमानी पद्धतीने दडपशाही विरोधात लढतो आहे त्याला साथ द्यायची सोडून तुम्ही कोल्हे ताईंवर टीका करून विवेकभैय्यांची सुरू असलेली लढाईची तीव्रता कमी करू शकत नाही कारण कितीही कुणी तुमच्या सारखे बरळले तरी त्याची ताकद समजून आम्ही विखे विरोधात अधिक सक्षम लढू.यापुढे कितीही धडपड करा तुम्हाला येणाऱ्या काळात जेवढे तुम्ही हतबल होऊन खोट नाटे बरळत राहाल तेवढे तुमचे पाय उघडे पडत जातील हे ही विसरू नका असा इशाराही जितेंद्र रणशूर यांनी दिला आहे.


कोपरगाव शहराच्या पाण्याच्या साठवण तलावासाठी जागा या स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांनी घेऊन ठेवल्या होत्या त्यामुळे शहरात पाणी येण्याचा मार्ग सुखकर झाला.त्यानंतर पाच नंबरचा ठराव देखील कोल्हे गटाने केला होता हे ही आपण मान्य केले त्याबद्दल वहाडणे यांना धन्यवाद दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत