राहुरी फॅक्टरी(वेबटीम) :-४/३/१९५७ रोजी स्थापन झालेल्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी प्राथमिक विद्यालय,श्रीशिवाजीनगर या शाळे...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
:-४/३/१९५७ रोजी स्थापन झालेल्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी प्राथमिक विद्यालय,श्रीशिवाजीनगर या शाळेचा ६७ वा वर्धापनदिन व ६८ वा स्थापना दिन मान्यवर,पालक वर्ग व बालचिमुकल्यांच्या समवेत जल्लोषात संपन्न झाला.
यावेळी पूर्वतयारीस्तव शाळेच्या नामफलकाचे पुर्नलेखन व उत्कृष्ट चित्रफलकलेखन श्री.विशाल तागड सर यांच्या कलाविष्कारातून साकार झाले.शाळेच्या वतीने सुशोभीकरण व सजावट करण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्थेचे प्राधिकृत अधिकारी मा.श्री.दिपक पराये साहेब,संस्था अधीक्षक मा.श्री.पारखे साहेब,संस्था अधिकारी मा.श्री.चोथे सर,मा.श्री.कदम सर,शेख चाचा,छ.शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक मा.श्री.खुळे सर,तेलोरे सर,आंबेकर सर,नाईक सर,जाधव सर,तागड सर,आमले मॅडम, कवाणे मॅडम, वने मॅडम व शिक्षक आणि कर्मचारी वृंद तसेच पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.मान्यवरांच्या शुभहस्ते रिबीन कापून श्रीफळ वाढवून सरस्वती मातेचे व छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.या स्तुत्य उपक्रमाचे उत्तम नियोजन म्हणून मा.श्री.खुळे सर यांनी छ.शिवाजी हायस्कूलच्या वतीने शाळेच्या मुख्या.मा.श्रीम.आवारे मॅडम यांचा सत्कार केला.१९५७ साली लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचे आज सुंदर वटवृक्ष झाल्याने व प्रारंभीच्या सर्व सेवानिवृत्त शिक्षकांचे कष्ट आणि आताच्या सर्व स्टाफचे नावीन्यपूर्ण संकल्पनेचे उपक्रम व भौतिक सुधारणा - गुणवत्ता याचे मा.श्री.कदम सर यांनी त्यांच्या मनोगतातून अभिनंदन केले.
याप्रसंगी सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षिका श्रीम.पवार मॅडम यांचा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा.श्रीम.आवारे मॅडम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.शाळा विकासात पालक वर्गाने जे सहकार्य केले,त्यास्तव प्रातिनिधिक स्वरूपात शाम सूर्यवंशी,अरुण कोळसे,प्रसाद लोखंडे,योगेश वाघ,सतीश खेत्रे यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
संस्थेच्या अनमोल सहकार्यातून लोकप्रिय खासदार मा.श्री.सुजयदादा विखे पा.यांच्या सौजन्यातून जिल्हा क्रीडा विकास निधीअंतर्गत शाळेस ३ लाख किंमतीचे खेळाचे साहित्य व खासदार मा.श्री.सदाशिव लोखंडे साहेब यांच्या निधीतून शाळेस ८ लाख किंमतीचे ओपन जिम व किड्स साहित्य प्राप्त झाले.
याबाबत प्रास्ताविकमध्ये श्री.अमित देशमुख सर यांनी खासदार मा.श्री.सुजयदादा विखे पा. व खासदार मा.श्री.सदाशिव लोखंडे साहेब यांचे व संस्थेतील सर्व पदाधिकारी यांचे शाळेच्या वतीने आभार मानले.मा.श्री.खुळे सर यांनी शाळेचे व शाळेतील विविध सृजन उपक्रमांचे कौतुक करून एकाच संस्थेतील दोन्ही शाळेचे जुने ऋणानुबंध असून भावाचे नाते असून यापुढेही एकमेकांच्या सहकार्यातून सर्वांगीण विकासाचे तत्व मांडले.पालकांनी देखील या उपक्रमाचे स्तुतीस्तव शाळेचे तोंडभरून कौतुक केले.
समारोपात शाळेच्या मुख्या.श्रीम.आवारे मॅडम यांनी या छोट्याशा निमंत्रणास मान देऊन सर्व मान्यवर उपस्थित झाले,याबाबत सर्वांचे जाहीर आभार मानले.शाळेतील सर्व स्टाफच्या वतीने उत्तम असे स्नेहभोजनाचे नियोजन करण्यात आले होते.बालचिमुकले विद्यार्थी व सर्व मान्यवरांनी भोजनाचा आस्वाद घेतला.हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी जे अतोनात परिश्रम घेतले,याबाबत मान्यवर व पालक वर्गाने अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत