देवळाली प्रवरा(वेबटीम) श्रमिक बांधकाम कामगार व इतर कामगार संघ महाराष्ट्र राज्य देवळाली प्रवरा यांच्या वतीने यांना कामगार आयुक्त नितीन कवले...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
श्रमिक बांधकाम कामगार व इतर कामगार संघ महाराष्ट्र राज्य देवळाली प्रवरा यांच्या वतीने यांना कामगार आयुक्त नितीन कवले यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले.
बोगस बांधकाम कामगार नोंदणी करणाऱ्या त्याचप्रमाणे बोगस नोंदणी करणाऱ्या दलालावर वर व बोगस शिक्के वापरून बनावट कागदपत्र करणाऱ्या वर कायदेशीर रित्या दंडात्मक कारवाई करण्यासाठी श्रमिक बांधकाम कामगार देवळाली प्रवरा आक्रमक भूमिकेत झालेली असून जे सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांना निवेदन दिले.
नितीन कवले यांनी सांगितले की जे बांधकाम कामगार नसतील त्यांच्यावर कायदेशीर रित्या कारवाई करण्यात येईल जे बोगस कागदपत्रे तयार करणारे दलाल असतील यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नितीन कवले म्हणाले.
जे कामगार खऱ्या अर्थाने कष्ट करतात असेच कामगार या योजनेपासून वंचित राहिलेले आहे परंतु अशा कामगारांना लाभ न मिळता ज्यांनी कधी बांधकामही देखील केले नाही अशा लोकांनी या बोगस कागदपत्राच्या द्वारे आपले नाव नोंदणी करून या योजनेचा लाभ घेतलेला आहे ह्या गोष्टी श्रमिक बांधकाम कामगार देवळाली प्रवरा यांच्या लक्षात आल्यानंतर यांनी तातडीने निवेदन तयार करून सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याचे सांगितले यावर कारवाई न केल्यास श्रमिक बांधकाम कामगार संघटना मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडल असा इशारा देण्यात आला. यावेळी शरद परदेशी, विजय कुमावत व सदस्य उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत