राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोडवरील ओंकारेश्वर मंदिरात उद्या शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोडवरील ओंकारेश्वर मंदिरात उद्या शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील ओंकारेश्वर मित्र मंडळाच्यावतीने महाशिवरात्रीनिमित्त  शुक्रवार दि.८ मार्च २०२४ रोजी विविध धार्म...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील ओंकारेश्वर मित्र मंडळाच्यावतीने महाशिवरात्रीनिमित्त  शुक्रवार दि.८ मार्च २०२४ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.




 राहुरी  फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोडवरील शिंदे वस्ती येथे असलेल्या ओंकारेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.यंदाच्या १७ वर्षीही कीर्तन, प्रवचन व खिचडी प्रसाद वाटपाचे आयोजन ओंकारेश्वर मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.




शुक्रवार ८ मार्च रोजी सकाळी ७ ते ९ महारुद्राभिषेक, सकाळी १० ते १२ या वेळेत आचार्य विद्यावाचस्पती डॉ.शुभम महाराज कांडेकर यांचे हरिकीर्तन व त्यांनंतर भव्य खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ ते ७ या वेळेत अशोक महाराज बर्डे यांचे प्रवचन होणार आहे.




हजारो भाविकांना दिवसभर खिचडी महाप्रसाद वाटपाचे नियोजन ओंकारेश्वर मित्र मंडळाने केले असून यासाठी विविध क्षेत्रातील मंडळी व दानशूर भाविकांचे सहकार्य लाभणार आहे.


या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन ओंकारेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रा.विलासराव मुसमाडे, उपाध्यक्ष भगवान काकड, उपाध्यक्ष किशोर थोरात, कार्याध्यक्ष विष्णुपंत गीते, उपकार्याध्यक्ष डॉ.बबनराव वाकचौरे, सचिव संजय वर्पे, व्यवस्थापक विठ्ठल आढाव, सहसचिव पुनमचंद भंडारी, सल्लागार डॉ.गोपाळकृष्ण रत्नपारखी, संघटक मुकुंद वेदपाठक, सहसंघटक प्रविण पवार, खजिनदार उत्तमराव घोलप, संयोजक संतोष कराळे, सहसंयोजक सुनील गागरे, मार्गदर्शक सुभाषराव घोरपडे, प्रसिध्दीप्रमुख हेमंत मिसाळ, श्रीकांत जाधव, ऋषीकेश राऊत तसेच सदस्य दिलीप गागरे, बाबासाहेब पवार, डॉ.राजेंद्र कवडीवाले, दिलीप भालेकर, बाळासाहेब आढाव, राजू शेख, उमाकांत अनारसे, संदीप जाधव, एकनाथ बनकर, संदीप तावरे, सुरेश भंडारी, संजय चोळके, किसन वरखडे, सुरेश चव्हाण, रवींद्र शिंदे, गणपत शिंदे, दत्तात्रय दरंदले तसेच ओंकारेश्वर मित्र मंडळ व परिसरातील माता-भगिनी नागरीक व भाविकांनी केले आहे.



*'स्वर्गर'थ लोकार्पण*

महाशिवरात्री दिवशी धनलक्ष्मी उद्योग समूह व श्री शिवाजीनगर व्यापारी असोसिएशनच्यावतीने 'स्वर्ग'रथाचे लोकार्पण आचार्य विद्यावाचस्पती डॉक्टर शुभम महाराज कांडेकर यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याचे विष्णुपंत  गीते यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत