राहुरी फॅक्टरीत सत्यजित कदम फाउंडेशनच्यावतीने महिला दिन उत्साहात साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत सत्यजित कदम फाउंडेशनच्यावतीने महिला दिन उत्साहात साजरा

  देवळाली प्रवरा(प्रतिनिधी) जागतिक महिलादिनानिमित्त सालाबादप्रमाणे देवळाली प्रवरा येथे सत्यजित कदम फाउंडेशनच्यावतीने राहुरी फॅक्टरीतील  वृंद...

 देवळाली प्रवरा(प्रतिनिधी)


जागतिक महिलादिनानिमित्त सालाबादप्रमाणे देवळाली प्रवरा येथे सत्यजित कदम फाउंडेशनच्यावतीने राहुरी फॅक्टरीतील  वृंदावन कॉलनी येथे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा महिलांसाठी अनोखा कार्यक्रम पार पडला


 प्रीती सत्यजित कदम यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या कार्यक्रमास महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरकास माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम व प्रीती कदम यांच्या हस्ते अभिवादन व आरती करून  त्यानंतर शहरातून महिलांची दुचाकी रॅली काढण्यात आली.


 भगवे फेटे परिधान करून मोठ्या संख्येने माता-भगिनी रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या.सायंकाळी वृंदावन कॉलनी येथे सांगली येथील नितीन गवळी प्रस्तुत 'होम मिनिस्टर खेळ पैठणी'चा हा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमांमध्ये देखील हजारो महिलांनी मोठा सहभाग घेऊन खेळाचा आनंद लुटला. देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथील महिला व तरुणींचे ढोल ताशा ध्वज पथक हे यंदाच्या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.


  होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या  सुरेखा जाधव, वैशाली चव्हाण व सायली गोपाळे  ह्या मानकरी ठरल्या असून त्यांना पैठणी बक्षीसे देण्यात आली. तसेच प्रज्ञा कोरडे व रंजना कोरडे उपस्थित लकी ड्रॉ विजेत्या ठरल्या.


  कै.प्रिया चंद्रशेखर कदम यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट सासू-सून पुरस्काराने  माया शर्मा व अश्विनी शर्मा, चंद्रभागा कौसे व जयश्री कौसे तर  मथुराबाई गोविंद मुसमाडे व जयश्री मुसमाडे, वंदना मुसमाडे या तीन सासू सुनांच्या जोडीला सन्मानित करण्यात आले.  तर सत्यजित कदम फाउंडेशनच्यावतीने सगुणाबाई संसारे, मंजूळाबाई मोरे, भामबाई जाधव, केशरबाई तोडमल, जिजाबाई वाळूंज, सीताबाई कदम, वनिता वरखडे यांना सत्यजित कदम फाऊंडेशनच्यावतीने जिव्हाळा पुरस्काराने गौरविण्यात आले. याकामी मीना कदम ,अनिता वीर ,सुनीता कदम, अनुजा मुळे ,साधना कदम ,जयश्री कोठुळे,प्रिया खाडे ,उर्मिला शेटे, मीना शेटे, अनुजा कदम ,तन्वी शिंदे, अंजली अंबिलवादे, महानंदा कदम यांनी अथक परिश्रम घेतले.महिला दिन कार्यक्रमाचे माजी आ.चंद्रशेखर कदम यांनी कौतुक केले.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी उपनगराध्यक्ष व उद्योजक प्रकाश संसारे, भारत शेटे, अमोल कदम, अजित चव्हाण, संतोष चव्हाण,  सुधीर टिक्कल, सचिन शेटे, सतीश वने, सचिन सरोदे,  प्रशांत कोठुळे, संदीप कदम, शशिकांत खाडे, रामेश्वर तोडमल, मनोज शिंदे, वसंत कदम, मंगेश ढुस, संजय सिनारे, गौतम भागवत, दानिश पठाण, आकाश गडाख, संतोष हारदे, आदित्य ताजने, युवराज कदम, धनराज कदम, ओंकार लांडे, अमोल ढुस, शरद गडाख, विजय भिंगारे आदिंसह सत्यजित कदम फाउंडेशनच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी तसेच  देवळाली प्रवराचे होमगार्ड प्रभारी अधिकारी अनिल कदम ,शरद कोबरणे, रविंद्र कदम, महादू दिवे,  समिर शेख आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.सर्वांचे आभार प्रीती कदम यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत