राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्याची भूमिपुत्र वांबोरी गावचे रहिवासी व सध्या गडचिरोली येथे सहाय्यक आयुक्त गुप्तवार्ता या पदावर कार्यरत असणारे ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्याची भूमिपुत्र वांबोरी गावचे रहिवासी व सध्या गडचिरोली येथे सहाय्यक आयुक्त गुप्तवार्ता या पदावर कार्यरत असणारे संदीप भांड यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की काल दिनांक 12 रोजी अप्पर पोलीस महासंचालक शिरीष जैन, आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या हस्ते सहाय्यक आयुक्त संदीप भांड, राज्य गुप्तवार्ता विभाग यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे.
त्यांना आणखी फोर्स वन या टेररिस्ट शूटर टीम मध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्पेशल फोर्स मेडल मंजूर झाले आहेत.
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांचे शौर्यपदक मंजूर झाले आहे. तसेच नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सेवा कालावधी बाबत आंतरिक सुरक्षा सेवा पदक मंजूर झाले आहे. तसेच भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ७५ वर्ष मेडल मंजूर झाले आहे .विविध स्तरांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत