अहमदनगर(वेबटीम) अहमदनगर येथील काँग्रेस नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस विनायक देशमुख यांनी भारतीय जनता पक्षाचे ...
अहमदनगर(वेबटीम)
अहमदनगर येथील काँग्रेस नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस विनायक देशमुख यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार अशोक चव्हाण, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मंत्री विजयकुमार गावित, माजी आमदार अमर राजूरकर, नगर जिल्हा दक्षिणेचे भाजप अध्यक्ष दिलीप भालसिंग, कोषाध्यक्ष दादासाहेब बोठे व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विनायक देशमुख यांनी आज काँग्रेसला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत