कोपरगाव(वेबटीम) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ...
कोपरगाव(वेबटीम)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांनी नुकतीच कोपरगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोपरगाव शहर उपाध्यक्ष पदावर कार्यरत असलेले भावेश रामचंद्र थोरात यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा युवक उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, आमदार सुनील भुसारा, जिल्हाध्यक्ष अमित भांगरे, प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हा कार्याध्यक्ष ॲड.संदीप वर्पे यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्र देत जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव राकेश कोते, नाशिक शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार आदीं सह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत