राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी- श्रीरामपूर रोडवर वाहनांचे प्रमाण वाढले असल्याने हा रस्ता ओलांडताना आतापर्यंत अनेक छोटे मोठे अपघात झा...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी- श्रीरामपूर रोडवर वाहनांचे प्रमाण वाढले असल्याने हा रस्ता ओलांडताना आतापर्यंत अनेक छोटे मोठे अपघात झाले आहे तर काहींनी या अपघातात आपला जीव केवळ रस्ता ओलांडताना गमावला आहे.
श्रीरामपूर रोड (वैष्णवी चौक) येथे धोक्याचे वळण असल्या कारणाने या ठिकाणी वाहनांचा वेग लवकर लक्षात येत नाही व याच कारणामुळे या ठिकाणी आतापर्यंत अनेक अपघात झाले आहे.
श्रीरामपूर रोडवर (राहुरी फॅक्टरी ते देवळाली)वैष्णवी चौक व न्यू इंग्लिश स्कुल येथे भविष्यात कुठला मोठा अपघात होऊ नये व कुठली मोठी जीवितहानी होऊ नये यासाठी गतिरोधके बसविण्यात यावी जेणेकरून या ठिकाणी भरधाव वेगाने चालणाऱ्या वाहनांना वेग मर्यादा येईल व भविष्यात या ठिकाणी कुठलाही अपघात होणार नाही.
प्रशासनाने या निवेदनाची दखल 22 मार्च 2024 पर्यंत न घेतल्यास 23 मार्च 2024 रोजी प्रशासनाचे या प्रश्नाकडे लक्ष जावे यासाठी परिसरातील नागरिक व शाळकरी मुलांच्या समवेत या रोडवर आंदोलन करण्यात येईल असा इशारा वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आला आहे.
राहुरी तहसील कार्यालय,राहुरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे युवराज कोकरे,राहुरी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन निवेदन देण्यात आले.
यावेळी वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक तसेच भाजप राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष वसंत कदम, मनोज गावडे,प्रथमेश थोरात,प्रसाद कदम,सचिन कदम,बाबासाहेब खांदे,धनंजय विटनोर,मयूर मोरे,ज्ञानेश्वर गागरे तसेच इतर सभासद हजर होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत