कोपरगाव शहर पोलीसांनी गावठी हातभट्टीवर दारू अड्डे उध्वस्त - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव शहर पोलीसांनी गावठी हातभट्टीवर दारू अड्डे उध्वस्त

  कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शहर पोलिसांनी संवत्सर व जेऊर पोटोदा शिवारात गावठी दारू अड्डे उध्वस्त करून २ लाख २९ हजार रुपयांची  तयार गावठी दारू ...

 कोपरगाव(वेबटीम)




कोपरगाव शहर पोलिसांनी संवत्सर व जेऊर पोटोदा शिवारात गावठी दारू अड्डे उध्वस्त करून २ लाख २९ हजार रुपयांची  तयार गावठी दारू व कच्चे रासायन नष्ट केले आहे.


 पोलीस निरीक्षक, प्रदिप देशमुख, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांना गोपनीयबातमीदारा मार्फत माहीती मिळाली कि, संवत्सर शिवारात नारदा नदीच्या कडेला काट वनात एक इसम हा गावठी हातभट्टीचीदारु तयार करीत आहे. अशी माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक प्रदिप देशमुख सो यांनी सपोनि विश्वास पावरा, सपोनीमयुर भांबरे, पोसई रोहीदास ठोंबरे, पोकॉ.गणेश काकडे, पोको श्रीकांत कुऱ्हाडे अशांना बातमीतील ठिकाणी

जावुन छापा टाकुन कारवाई करणे कामी आदेशीत केल्याने सदर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीतील

ठिकाणी संवत्सर शिवारात नारंदा नदीच्या कडेला व गोदावरी नदीच्या कडेला काटवनात दोन ठिकाणी छापा टाकुन कारवाई

केली आहे. सदर ठिकाणी महिला नामे मंदाबाई बळीराम आहेर रा.मनाईवस्ती, शिंगणापुर कोपरगाव हिचेकडे गावटीहातभट्टीची

दारु तयार करण्याचे कच्चे रसायन ९५०००/- रु कि चे ९५० लिटर कच्चे रसायन व २०००/- रु कि ची २० लिटर गावटी

हातभट्टीची तयार दारु मिळुन आली. ती जप्त करुन त्यामधुन शॅम्पल काढुन पंचासमक्ष जागीच नाश केले आहे.सदर बाबत

पोकॉ/२६३१ श्रीकांत बाळु कुऱ्हाडे यांचे फिर्यादीवरुन सदर महिलाविरुध्द कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुरजि न

१२१/२०२४ महाराष्ट्र दारु बंदी कायदा कलम ६५ (फ)(ड) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.



तसेच संवत्सर शिवारात गोदावरी नदीच्या कडेला काटवनात आरोपी नामे साहेबराव नाना सोनवणे रा. मनाईवस्ती, संवत्सर ता. कोपरगाव हा गावठीहातभट्टीची दारु तयार करीत असलेल्या ठिकाणी छापा टाकला असता त्याचेकडे ३०,०००/-रु कि चे गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याचे कच्चे रसायन मिळुन आले पंचनामा करुन तेपंचासमक्ष जागीच नाश केले आहे. त्याबाबत सदर इसमा विरुध्द कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गु. रजि. न १२२ / २०२४ महाराष्ट्र दारु बंदी कायदा कलम ६५ (फ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


तसेच जेउर पाटोदा शिवारात गोदावरी नदीच्या कडेला काटवनात इसम नामे अर्जुन निंबा देसले रा. जेउर पाटोदाता. कोपरगाव हा गावठीहातभट्टीची दारु तयार करीत असलेल्या ठिकाणी छापा टाकला असता त्याचेकडे १,०२,०००/- रु किचे गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याचे कच्चे रसायन व गावठी हातभट्टीची तयार दारु मिळुन आली. ती पंचासमक्षपंचनामा करुन जागीच नाश केले आहे. सदर पोकॉ / २५६३ गणेश वशिष्ट काकडे यांचे फिर्यादीवरुन कोपरगाव शहर पोलीसस्टेशन गु. रजि. न १२३ / २०२४ महाराष्ट्र दारु बंदी कायदा कलम ६५ (फ) (ड) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधीकारी  शिरिष वमने, सो. यांचे मार्गदर्शनाखली प्रदिप देशमुख, स.पोनि. विश्वास पावरा, सपोनि मयुर भांबरे, पोसई रोहीदास ठोंबरे, गणेश वशिष्ट काकडे, श्रीकांत कुन्हाडे यांनी केलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत