राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथील किराणा दुकानास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना गु...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथील किराणा दुकानास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.
चिंचोली फाटा येथील चौकात गोरख नलगे यांचे चंद्रनाथ किराणा स्टोअर्स असून गुरुवारी रात्री विजेच्या शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. आग विझविण्यासाठी विखे साखर कारखाना व देवळाली प्रवरा नगरपरिषद अग्निशामक दलास बोलविण्यात आले. मात्र या आगेत किराणा माल जळून खाक झाला आहे .
आग विझविण्यासाठी सरपंच बंटी लाटे, माजी सरपंच गणेश हारदे, वामन लाटे, सर्जेराव लाटे, बाळासाहेब पारखे, सतीश लेंगारे, रामा गागरे आदिंसह परिसरातील नागरिकांनी मदत कार्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत