राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी- श्रीरामपूररोड वरील वैष्णवी चौक व न्यू इंग्लिश स्कुल परिसरात गतिरोधक बसवावे अशी मागणी करून वैष्णवी च...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी- श्रीरामपूररोड वरील वैष्णवी चौक व न्यू इंग्लिश स्कुल परिसरात गतिरोधक बसवावे अशी मागणी करून वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानने आंदोलनाचा इशारा देताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. संध्याकाळी तात्काळ दोन्ही ठिकाणी गतिरोधक बसविल्याने वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे नागरिकांनी कौतुक केले आहे.
राहुरी फॅक्टरी- श्रीरामपूर रोडवर वाहनांचे प्रमाण वाढले असल्याने हा रस्ता ओलांडताना आतापर्यंत अनेक छोटे मोठे अपघात झाले आहे तर काहींनी या अपघातात आपला जीव केवळ रस्ता ओलांडताना गमावला आहे. श्रीरामपूर रोड (वैष्णवी चौक) येथे धोक्याचे वळण असल्या कारणाने या ठिकाणी वाहनांचा वेग लवकर लक्षात येत नाही व याच कारणामुळे या ठिकाणी आतापर्यंत अनेक अपघात झाले आहे.
श्रीरामपूर रोडवर (राहुरी फॅक्टरी ते देवळाली)वैष्णवी चौक व न्यू इंग्लिश स्कुल येथे भविष्यात कुठला मोठा अपघात होऊ नये व कुठली मोठी जीवितहानी होऊ नये यासाठी गतिरोधके बसविण्यात यावी जेणेकरून या ठिकाणी भरधाव वेगाने चालणाऱ्या वाहनांना वेग मर्यादा येईल व भविष्यात या ठिकाणी कुठलाही अपघात होणार नाही, अशी मागणी व आंदोलन इशारा वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानने देताच प्रशासनाने वैष्णवी चौक व न्यू इंग्लिश स्कुल चौकात गतिरोधक बसविले आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत