राहुरी फॅक्टरीतील कराळेवाडी साईनगर येथे उद्या शनिवारी मोफत सर्वरोग निदान शिबिर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील कराळेवाडी साईनगर येथे उद्या शनिवारी मोफत सर्वरोग निदान शिबिर

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील कराळेवाडी येथील साईनगर येथे उद्या शनिवार दिनांक १६ मार्च रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत मोफत सर्व...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील कराळेवाडी येथील साईनगर येथे उद्या शनिवार दिनांक १६ मार्च रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत मोफत सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.


 वै.प्रकाश रंगनाथ शेळके(टेलर्स) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गॅलक्सी फाउंडेशन व ओमकार हॉस्पिटल, राहुरी फॅक्टरी आयोजित या शिबिरात डोळे तपासणी , ड्रॉप वाटप तसेच अल्पदरात चष्मे वाटप,  वृद्धांसाठी मोफत काठी वाटप तसेच बी.पी., शुगर तपासणी डोकेदुखी, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, त्वचेचे आजार, पोटाचे विकार, मणक्याचे आजार अशा सर्व आजारांवर मोफत औषधे वाटप गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेवात, हात पाय दुखणे, मानदुखी या सर्व आजारांवर आयुर्वेदिक, थेरपी मोफत करण्यात येईल.डोळ्यांसाठी नंबर लागल्यास १००० रु.चा चष्मा फक्त १५० ते २०० रु. मध्ये उपलब्ध करून देण्यात येतील. हाडमोडणे, मुतखडा आणि प्रोस्टेट ऑपरेशन मोफत केले जाईल.


याबाबत आधिक माहितीसाठी ९९७०८४२०७५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत