देवळाली प्रवरा(वेबटीम) जागतिक महिला दिनानिमित्त सालाबादप्रमाणे देवळाली प्रवरा येथील ग्लोबल विजड्म स्कूलमध्ये महिला दिनाचा कार्यक्रम उत्स...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
जागतिक महिला दिनानिमित्त सालाबादप्रमाणे देवळाली प्रवरा येथील ग्लोबल विजड्म स्कूलमध्ये महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
स्कूलच्या प्राचार्य सुवर्णा कोठुळे यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या कार्यक्रमास महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. बऱ्याच महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. महिलांनी प्राचार्य कोठुळे यांचे आभार व्यक्त केले. महिलांना चूल व मूल या व्यतिरिक्त एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते विजेत्या महिलांना विविध बक्षिसे देण्यात आले. महिलांनी खेळात सहभागी होवून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ढुस मॅडम यांनी केले व विविध खेळाचे आयोजनवाणी मॅडम, झिन मॅडम, गाढे मॅडम, सौ. सीना वाणी, शितल झिने, अश्विन गाढे, संगिता क्षिरसागर, वैशाली देवतरसे, पुजा कोतकर व अंकिता मुसमाडे यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ. सुनिता मुसमाडे व गोविंद मुसमाडे यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत