राहुरी/वेबटीम:- केंद्र शासनाच्या विधी व न्याय मंत्रालयाच्यावतीने राहुरी न्यायालयातील ॲड.मच्छिंद्र देशमुख यांची नोटरी पब्लिकपदी निवड करण्या...
राहुरी/वेबटीम:-
केंद्र शासनाच्या विधी व न्याय मंत्रालयाच्यावतीने राहुरी न्यायालयातील ॲड.मच्छिंद्र देशमुख यांची नोटरी पब्लिकपदी निवड करण्यात आली आहे.
ॲड.मच्छिंद्र देशमुख हे गेल्या २१ वर्षांपासून राहुरी न्यायालयात वकिली व्यवसायात कार्यरत आहेत. विविध बँका, वित्तिय संस्था, सामाजिक संघटना यावर कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत असून त्यांची राहुरी न्यायालयात २१ वर्षापासून वकील करत असून. विधी व न्याय मंत्रालयाकडून देशमुख यांची भारत सरकार नोटरीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
त्यांनी सुरवातीच्या काळात ज्येष्ठ ॲड.स्व.प्रभाकरराव मेहेत्रे,ॲड.भास्करराव शिरसाठ यांचे मार्गदर्शनाखाली काम केले त्यांचे वडील ज्येष्ठ पत्रकार स्व.भगवानराव देशमुख होत त्यांचाही सामाजिक कार्यात मोठा वाटा होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत