राहुरी फॅक्टरी/वेबटिम:- राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने राष्ट्रीय शूटिंग्स बॉल स्पर्धेत निवड झालेल्या कुमारी कावे...
राहुरी फॅक्टरी/वेबटिम:-
राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने राष्ट्रीय शूटिंग्स बॉल स्पर्धेत निवड झालेल्या कुमारी कावेरी संसारी व महाराष्ट्र राज्य शूटिंग बॉल संघामध्ये निवड झालेल्या कु.प्रज्ञा गडाख,कु.प्रगती गडाख व तनिष्का गवळी यांचा आदर्श नागरि पतसंस्थेचे चेअरमन विष्णुपंत गीते यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.
मागील काही दिवसापूर्वी राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धा व महाराष्ट्र राष्ट्रीय शूटिंग बॉल संघामध्ये राहुरी फॅक्टरी येथील कावेरी संसारे त्याचबरोबर प्रज्ञा गडाख प्रगती गडाख,तनिष्का गवळी यांचा देखील शूटिंग बॉल संघामध्ये निवड झाल्याबद्दल आदर्श नागरि पतसंस्थेच्या वतीने हा सन्मान करण्यात आला.
प्रसंगी संस्थेचे मॅनेजर ज्ञानेश्वर सोनवणे, क्रीडा शिक्षक राजेंद्र पुजारी सर, दत्तात्रय मोरे, गणपत शिंदे व आदर्श नागरी पतसंस्थेचे सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते.
दरम्यान साई आदर्श परिवाराचे वेदांत शिवाजीराव कपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा देखील आदर्श नागरिक पतसंस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत