राहुरी फॅक्टरी(प्रतिनिधी) शून्यातून विश्व निर्माण करून पायल कलेक्शने आपल्या व्यवसायात प्रगती साधून आज स्वमालकीच्या जागेत भव्य दिव्य वास्तू...
राहुरी फॅक्टरी(प्रतिनिधी)
शून्यातून विश्व निर्माण करून पायल कलेक्शने आपल्या व्यवसायात प्रगती साधून आज स्वमालकीच्या जागेत भव्य दिव्य वास्तू उभारली. उत्तम सेवा व गुणवत्ता देऊन नहार कुटुंब व्यवसायात निश्चित आणखी भरारी घेतील असे प्रतिपादन महंत उद्धव महाराज मंडलीक यांनी केले.
राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड मार्गालगत पायल कलेक्शन या भव्य दालनाचा मंगळवारी सायंकाळी उद्धव महाराज मंडलीक यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन सोहळा पार पडला.प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्षा डॉ.उषाताई तनपुरे, प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेशशेठ वाबळे, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, संजय महाराज शेटे, आदर्श नागरी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन आबासाहेब वाळुंज, विजयकुमार संकलेचा, सुरेश नहार आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी दिलीप ओस्तवाल, पारस ओस्तवाल, पारस सुराणा, उद्योजक गणेश दादा भांड, बाळासाहेब ढोकणे, कोहोकडे काका, किशोर थोरात, प्रकाश बडजाते, मनीषा पोटे, स्विटी ओस्तवाल आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष नहार, वैशाली नहार, सुमित नहार, पायल नहार, महावीर नहार पारस नहार व नहार कुटुंबांनी अथक परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत