राहुरी(प्रतिनिधी) रिपब्लिकन पार्टी ऑफ आंबेडकर पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवळाली नगरपरिषदेचे व देवळाली प्रवराचे माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पगारे...
राहुरी(प्रतिनिधी)
रिपब्लिकन पार्टी ऑफ आंबेडकर पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवळाली नगरपरिषदेचे व देवळाली प्रवराचे माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी मुंबई येथे बाळासाहेब ठाकरे भवन मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
यावेळी मंत्री दादा भुसे, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट, मुंबई वडाळा येथील नगरसेविका पुष्पा कोळी, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थितीत होते.
शेकडो कार्यकर्त्याच्या उपस्थितीत भाऊसाहेब पगारे यांनी शिवसेना गटामध्ये प्रवेश केला आहे.
असून यावेळी नामदार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच बंदरे विकत मंत्री दादा भुसे यांच्या शुभहस्ते माननीय भाऊसाहेब पगारे यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी शिवसेना शिंदे गटामध्ये भाऊसाहेब पगारे यांनी प्रवेश केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानत शिर्डी लोकसभा मतदार संघासह नगर जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद भक्कमपने वाढली असून शिवसेनेचे नुकतेच शिर्डी लोकसभा मतदारसंघात उभे असलेले सदाशिव लोखंडे यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला असून लोखंडे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत