पानेगांव (वार्ताहर)- नेवासे तालुक्यातील पानेगांव येथे दि.१०रोजी अहमदनगर जिल्हा परिषदेचे डेप्युटी सी,ओ समर्थ शेवाळे यांनी भेट दिली येथील विव...
पानेगांव (वार्ताहर)-
नेवासे तालुक्यातील पानेगांव येथे दि.१०रोजी अहमदनगर जिल्हा परिषदेचे डेप्युटी सी,ओ समर्थ शेवाळे यांनी भेट दिली येथील विविध शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या योजनांची पाहणी करून समाधान व्यक्त करुन जिल्ह्यात पानेगांव ग्रामपंचायत माॅडेल व्हिलेज म्हणून वाटचाल सुरु असल्याचा गौरव त्यांनी यावेळी केला.
ग्रामपंचायत कार्यालय झालेल्या चर्चा सत्रात त्यांनी ग्रामसेवक, सरपंच उपसरपंच पाणीपुरवठा कर्मचारी आॅपरेटर तसेच ग्रामस्थ यांना सांगितले की, स्वच्छ भारत मिशन, वसुंधरा योजना,पाणी आडवा,पाणी जिरवा, जल जिवन,वृक्षारोपण, हर घर शुद्ध जल, बचतगट चळवळ, अंगणवाडी रेन हार्वेस्टिंग,पाणी पट्टी, घरपट्टी, गावातील दुकान कर वसुली आदी वर मागदर्शन करुन पानेगांव ग्रामपंचायत अंतर्गत विकास योजना समाधानकारक आहेत. परंतु कर वसुली मोठी थकीत आहे.शासनाच्या वतीने विविध पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी पानेगांव ग्रामपंचायत पात्र आहे. यासाठी कर वसुली १००% होणे गरजेचे आहे. गावच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल यावेळी शेवाळे यांनी सांगितले. राज्यात बुलढाणा तसेच इतर जिल्ह्यात व आपल्या जिल्ह्यात काम करण्याचा योग आला.मी तळागाळापर्यंत फिल्ड वर पाहणी दौऱ्यात नेहमी जात असतो पानेगांव वातावरण तसेच झालेला विकास पाहून समाधान मिळाले.
सोनई करजगांव १८गांव प्रादेशिक पाणी योजनेचे अध्यक्ष संजय जंगले यांनी गावच्या विकास कामांची माहिती दिली. नामदार शंकरराव गडाख पाटील लोकनेते सुनिलभाऊ गडाख पाटील यांनी दिलेल्या भरघोस निधी मुळे गावाचा विकास झाला असून डिजिटल प्राथमिक शाळा, भव्यदिव्य शिवस्मारक,नूतन ग्रामपंचायत कार्यालय, बंदिस्त गटार,मोक्षधाम जवळपास दोन हजार वृक्ष लागवड , येथे सोनई काॅलेजच दरवर्षी शिबीर आयोजन येथील असलेल्या प्रसन्न वातावरण सर्व सोयी सुविधा उपलब्ध असल्याने निवड केली जाते.
लोकनियुक्त सरपंच सौ निकीता भोसले, उपसरपंच दत्तात्रय घोलप, ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे यांनी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व एक दिलाने काम करतो.
नेवासे पंचायत समिती विस्तार अधिकारी सुवर्णा लेंडे,अमोल गांगुर्डे, सुहास मिरपगार, मा उपसरपंच रामराजे जंगले, सतिश जंगले, मच्छिंद्र खेमनर भाऊसाहेब काकडे,रघूनाथ जंगले,ग्रामपंचायत सदस्य रमेश जंगले,सौ.दिपाली जंगले, संदिप जंगले,सागर आंबेकर,चिऊ आंबेकर,गणेश गायकवाड,सुनिल चिंधे, बाबासाहेब शेंडगे, आदींसह मान्यवर उपस्थित होते.प्रस्ताविक पत्रकार बाळासाहेब नवगिरे पाटील यांनी केले .आभार सुभाष गुडधे यांनी मानले.
जिल्हा परिषद डिजिटल प्राथमिक शाळा पानेगांव, भव्य दिव्य असलेले शिवस्मारक,गावामध्ये सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताहात डेप्युटी सी ओ समर्थ शेवाळे यांनी भेट दिली तसेच या अगोदर तीस वर्षे पुर्वी गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग नोंदवून पुरस्कार मिळाला होता. भविष्यात लवकरच पुन्हा गावाला राज्यस्तरीय पुरस्कार नक्कीच मिळेल व पानेगांव माॅडेल व्हिलेज म्हणून गणना होईल.
डेप्युटी सी.ओ समर्थ शेवाळे
अहमदनगर जिल्हा परिषद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत