राहुरी फॅक्टरी(वेबटीम) येथे कामगार वसाहत मधील हिंदू आणि मुस्लिम समाजातील महिला भगिनीनी एकत्र येवून मुस्लिम समाजातील भगिनीसाठी महाराष्ट्रा...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
येथे कामगार वसाहत मधील हिंदू आणि मुस्लिम समाजातील महिला भगिनीनी एकत्र येवून मुस्लिम समाजातील भगिनीसाठी महाराष्ट्रातील सुप्रसिध्द शिवचरित्रकार हिंदू-मुस्लिम समाजाचे एकतेचे प्रतिक असणारे हसन सय्यद यांच्या निवास स्थानी पवित्र रमजान महिन्याच्या शेवटचे रोजा इफ्तारीसाठी जाती धर्माच्या पलीकडेही मानवता धर्म जोपासणारे हिंदू आणि मुस्लिम समाजातील भगिनींनी इफ्तारचे स्तुत्य आयोजन करून समाजात आदर्श निर्माण केले.
दरम्यान या आदर्शदायी कार्यक्रमात कॉलनीतील महिला भगिनी आणि पुरुष मंडळीही मोठ्या संख्येने उपस्थित होते, या निमित्ताने मीनाक्षी तनपुरे, जयश्री वाबळे, गौरी गागरे, मंगळ पवळ, तन्वी पवळ, कौसाबाई पवळ, अर्शिया सय्यद, रेश्मा सय्यद, मार्गारेट चाबुकस्वार, आयुषा गागरे, सिध्दी तनपुरे, नसीम सय्यद, बुशरा सय्यद, प्रियंका वाळके, खुशी सय्यद, कलावती वंजारी, सुलभा लोखंडे, लोंढे मावशी, सुर्यवंशी मावशी, कैलास पवळ, परशराम वाबळे, जॉन चाबुकस्वार, मयंक तनपुरे, यश लोखंडे, सार्थक पवळ, रेहान सय्यद, आयान सय्यद, हम्जा सय्यद, मासूमभाई सय्यद, मोसीन शेख, अशपाक सय्यद, गणेश गागरे, राजेंद्र लोखंडे, सुरेश लोखंडे, शिवचरित्रकार हसन सय्यद आदी सर्व समाज बांधव उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत