राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील भीमतेज मित्र मंडळ, जय भीमक्रांती सामाजिक संघटना व शिवतेज सामाजिक, सांस्कृतिक व ग्रामीण विकास सहक...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील भीमतेज मित्र मंडळ, जय भीमक्रांती सामाजिक संघटना व शिवतेज सामाजिक, सांस्कृतिक व ग्रामीण विकास सहकार्याने संविधान विचारमंचच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिनांक १४ व १५ एप्रिल रोजी भीमतेज चौक, कामगार वसाहत येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१४ एप्रिल एप्रिल रोजी सकाळी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन त्यानंतर राहुरी येथील लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने १० ते ५ यावेळेत सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले.
१५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता राहुरी फॅक्टरी, देवळाली प्रवरा व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा भीम गौरव पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. त्यानंतर शिवराय-भीमराय गीतांचा कार्यक्रम व स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी सर्व धर्मीय धर्मगुरू व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी गावराण मस्ती, गावराण मेवा धमाल प्रॉडक्शन फेम सरपंच उर्फ किरण बेरड (सर) गंठ्या उर्फ वैभव कुऱ्हाडे चेअरमन उर्फ सचिन पंडीत खास आकर्षण उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमात उपस्थित रहावे असे आवाहन शिवचरित्रकार हसन सय्यद, नेल्सन कदम, पत्रकार आशिष संसारे, किरण पंडित यांच्यसह सामाजिक संघटनांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत