पानेगांव (वार्ताहर)- धर्म सेवा करणाऱ्यांनाच काल्याचा लाभ मिळतो असे पानेगांव (ता. नेवासे)येथे ५८वा अखंड हरिनाम सप्ताहाचा काल्याच्या किर्तन ...
पानेगांव (वार्ताहर)-
धर्म सेवा करणाऱ्यांनाच काल्याचा लाभ मिळतो असे पानेगांव (ता. नेवासे)येथे ५८वा अखंड हरिनाम सप्ताहाचा काल्याच्या किर्तन रुपी सेवेत हभप भगवान महाराज शास्त्री बोलतं होते.
देवा दिकांना जो लाभ मिळत नाही तो लाभ संताच्या व वारकऱ्यांचा कृपेने सर्व सामान्य भक्तांना मिळतो.युद्ध भूमि भागवत चरित्र सर्व काही चरित्र परंतु काल्याच्या किर्तनात बाल गोपाळ कृष्ण चे चरित्र उच्चारले जाते.त्यांचेच वर्णन काल्याच्या किर्तनात घेतात, सर्वच गोष्टी शास्त्रात लिहीलेल्या नसतात त्या परंपरेने आलेल्या असतात.
भारतीय परंपरेचा अभिमान वारकऱ्यांना असला पाहिजे.यावेळी जंगले महाराज शास्त्री यांनी सांगितले.आपल्या वाणीतून गोपाल श्रीकृष्ण भगवान अनेक लिला या निमित्ताने सांगून मंत्रमुग्ध केले.
देवगड संस्थानचे मठाधिपती महंत भास्करगिरी महाराज यांचा मार्गदर्शनाखाली आठ दिवस चालणाऱ्या ५८वा अखंड हरिनाम सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वाचन, काकडा आरती, हरिपाठ, निवृत्तीनाथ महाराज यांच जिवन चरित्र कथा हभप रायभान महाराज डिके पैठण यांचा मधूर वाणीतून पार पडले.
महाराष्ट्रभरातील नामांकित महाराजांचे किर्तन सेवेचं आयोजन करण्यात आले. तसेच आठ दिवस ग्रामस्थांच्या सहभागातून अन्नदान करण्यात आले.
कार्यक्रमासाठी लोकनेते सुनिलभाऊ गडाख पाटील, श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती वंदना मुरकुटे, अहमदनगर जिल्हा परिषदेतील डेप्युटी सी ओ समर्थ शेवाळे,माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, सोनई पोलीस ठाण्याचे सपोनि अशिश शेळके त्याच बरोबर,पानेगांवचे माजी सरपंच संजय पाटील जंगले हौशाबापू जंगले, डॉ जयवंत गुडधे, उपसरपंच दत्तात्रय घोलप पोलीस पाटील बाबासाहेब जंगले, लोकनियुक्त सरपंच सौ निकीता भोसले, तंटामुक्ती अध्यक्ष उद्धव चिंधे, तंटामुक्ती उपाध्यक्ष सुरेंद्र जंगले, डॉ काकडे, अॅड किरण जंगले,मुळाचे संचालक रंगनाथ जंगले, भाऊसाहेब काकडे,रघूनाथ जंगले, नानासाहेब जंगले, चंद्रकांत जाधव, निवृत्ती जंगले रमेश गुडधे सुरज जंगले, महालक्ष्मी देवस्थान रमेश जंगले, विजय जंगले, महेश जंगले, अनिल जंगले संकेत जंगले, प्रकाश जंगले,सुभाष गुडधे, संदिप जंगले, सुजित नवगिरे, हभप रमेश जंगले हभप कल्याण पुराणे हभप सागर टेमक,रविंद्र सोनवणे,संजय गागरे, मुकुंद घोलप, नारायण तांबे,आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पानेगांव येथे भव्यदिव्य असा हरिनाम सप्ताह पार पडला या निमित्ताने हरिनाम जप झाला तसेच रांगोळी स्पर्धा संगित खुर्ची, विविध स्पर्धेचे आयोजन या निमित्ताने झाले आठ दिवस चालणाऱ्या अन्नदान तसेच युवकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला निश्चित अभिमान वाटतो मी सुद्धा रोज एक तास हरिनाम जप व भजन करतो किर्तन रुपी सेवेसाठी नेहमी उपस्थित असतो- सपोनि अशिश शेळके सोनई पोलीस स्टेशन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत