देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा शहरातील साई प्रतिष्ठानच्यावतीने दिनांक १७ ते १८ एप्रिल रोजी श्रीरामनवमी उत्सव साजरा केला जाणार असून ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा शहरातील साई प्रतिष्ठानच्यावतीने दिनांक १७ ते १८ एप्रिल रोजी श्रीरामनवमी उत्सव साजरा केला जाणार असून भाविकांनी मोठ्या संख्यने उपस्थित रहावे असे आवाहन श्री साई प्रतिष्ठान व देवळाली प्रवरा शहरवासियांच्यावतीने करण्यात आले आहे.
देवळाली प्रवरातील श्री साई मंदिरात १७ एप्रिल २०२४ रोजी पहाटे ६ वाजता गंगाजल स्नान व काकड आरती होणार असून सकाळी ६.३० सकाळी ७.१५ वाजता शिर्डी माझे पंढरपुर आरती होईल त्यानंतर दुपारी १२ वाजता श्री साईबाबांची मध्यान्ह आरती होईल त्यानंतर सायंकाळी ६ वाजता पालखी पूजन करून त्यानंतर सायंकाळी ठीक ६.३० वाजता छबिना मिरवणूक संपन्न होणार आहे. या छबिना मिरवणुकीत देवळाली प्रवरातील मिलन ब्रास बँड व संजय ब्रास बँड पथक यांची जुगलबंदी होणार आहे.
रात्री १० वाजता साईबाबा यांची शेजारती व त्यानंतर वांबोरी येथील शेख दारूवाला यांच्या माध्यमातून शोभेची दारूची आतिषबाजी होणार आहे.
१८ एप्रिल रोजी सकाळी ६.१५ वाजता श्रींची काकड आरती मंगल स्नान व नित्य पूजन, दुपारी १२ वाजता श्री ची मध्यान्ह आरती त्यानंतर खिचडी महाप्रसादाचा कार्यक्रम , सायंकाळी ५.३० वाजता हरिपाठ, सायंकाळी ७ वाजता श्रींची धुपारती होईल व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साई प्रतिष्ठान व देवळाली प्रवरा शहरवासिय यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत