आंबी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील आंबी-अमळनेर येथील पाळंदे वस्ती येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी ...
आंबी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील आंबी-अमळनेर येथील पाळंदे वस्ती येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी येथील जेष्ठ नागरिक, महिला, तरुणांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी महिला वर्गाने सुमधुर आवाजात भीम गीतांचे गायन केले. अभिवादन करण्यासाठी महिला व तरुणांची मोठी संख्या होती. याप्रसंगी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजासाठी केलेल्या कार्याला उजाळा दिला. भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही स्थापन करून सार्वभौम व दिल दुबळ्यांना न्याय देणारी राज्यघटना लिहिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिसरातील तरुणाईने परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत