देवळाली प्रवराच्या सून डॉ.योगिता प्रवीण चोळके यांचा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवराच्या सून डॉ.योगिता प्रवीण चोळके यांचा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर(वेबटीम)  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर योगिता प्रवीण चोळके यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून नगर दक्षिण...

अहमदनगर(वेबटीम)



 आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर योगिता प्रवीण चोळके यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दाखल केला आहे. यामुळे नगर दक्षिणेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे.



 जनसामान्यामधील प्रभावी व उच्च शिक्षित महिला उमेदवाराच्या एंट्रीने नगरमध्ये एकच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे, डॉ. योगिता चोळके या आरोही कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर, पुणे येथे प्राचार्य असून त्या देवळाली प्रवरा, ता. राहुरी येथील प्रगतशील शेतकरी श्री. बाळासाहेब विष्णु चोळके यांच्या सुनबाई आहेत. 

 जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना डॉ. योगिता चोळके म्हणाल्या कि, महिलांच्यान्याय व हक्कासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच सर्व मतदार बंधू भगिनींना आपल्या मतदानाचा हक्क बाजाबाण्याचं आव्हान केले आहे. 


तसेच आज २६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे अर्ज छाननी होऊन डॉ.योगिता याचा अर्ज वैध ठरला असून सोमवारी दि.२९ एप्रिल रोजी दुपारी निवडणूक चिन्ह मिळणार आहे व त्यानंतर देवळाली प्रवरा येथील ग्रामदैवतांची पुजा करून प्रजाराचा नारळ फोडला जाऊन प्रचाराला सुरुवात होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत