मराठा आरक्षणाचा लढा संसदेत पोहचवण्या साठी मदत करा"* ऍड. नितीन पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मराठा आरक्षणाचा लढा संसदेत पोहचवण्या साठी मदत करा"* ऍड. नितीन पोळ

कोपरगाव(वेबटीम) गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील गरीब मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे.मात्र ज्यांनी गोर गरीब मराठा समाजाच्या जीवावर राजक...

कोपरगाव(वेबटीम)



गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील गरीब मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे.मात्र ज्यांनी गोर गरीब मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करून सर्वोच्च सत्ता, संपत्ती मिळवली ते राजकीय नेते फक्त मराठा समाज बांधवांच्या आरक्षण लढ्यात मताचे राजकारण व राजकीय अभिलाषा ठेऊन समोरे जातात.मागील 2014 च्या निवडणुकी पूर्वी राजकीय नेत्यांनी मराठा मोर्चे काढून अशीच वातावरण निर्मिती केली होती या वेळी 2023 मध्ये मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभे राहिले मात्र राजकीय पक्ष व नेत्यांनी हा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला नाही. निवडणुकी आधी सत्तानंतर होऊन भाजप सोबत शिवसेना, राष्ट्रवादी यांचे अनेक नेते गेले मराठा आरक्षणाला कोणाचाच विरोध नाही केंद्र सरकारने काश्मीर चे कलम 370, आणि राम मंदिर, हिजाब या प्रश्नात जेवढे लक्ष घातले तेवढे या आरक्षण प्रश्नात घातले असते तर कोट्यावधी मराठा समाज सुखी झाला असता मात्र या प्रश्नावर फसव्या घोषणा करून जनतेची दिशाभूल केली आहे असेच दिसते.




शिर्डी लोक सभा मतदार संघ अनुसूचित जाती साठी आरक्षित (राखीव )आहे त्या आरक्षित जागे मुळेच निवडणूक लढावण्याची संधी प्राप्त झालेली आहे आता पर्यंत घटनात्मक मार्गाने वंचित मराठा बांधवाना आरक्षण मिळावे या मागणी साठी सतत आंदोलन मोर्चे यांच्या मध्ये सहभागी होऊन रास्त भूमिका मांडली आहे लोक सभेच्या निवडणुकीत मराठा बांधवानी सहकार्य केल्यास संसदेत मराठा आरक्षनाचा लढा पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल हा विश्वास देतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत