श्रीरामपूर येथे आज शनिवारी सायंकाळी बौद्ध मुस्लिम ख्रिश्चन ऐक्य परिषदेचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपूर येथे आज शनिवारी सायंकाळी बौद्ध मुस्लिम ख्रिश्चन ऐक्य परिषदेचे आयोजन

श्रीरामपूर(वेबटीम) बहुजन क्रांती मोर्चा व महामानव विचार प्रबोधन समितीच्यावतीने राष्ट्रपिता जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयु...

श्रीरामपूर(वेबटीम)



बहुजन क्रांती मोर्चा व महामानव विचार प्रबोधन समितीच्यावतीने राष्ट्रपिता जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने शनिवारी (दि. २७) सायंकाळी चार वाजता येथील खासदार गोविंदराव आदिक सभागृह येथे बौद्ध-मुस्लिम-ख्रिश्चन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.


या परिषदेचे उद्घाटन बहुजन क्रांती मोर्चा चे जिल्हाध्यक्ष एस. के. चौदंते हे करणार असून विशेष अतिथी म्हणून ख्रिश्चन धर्मगुरू रेव्ह. फादर जो गायकवाड ,मौलाना मुक्ती इम्तियाजुद्दीन व भंते उपाली हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची अध्यक्षता बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय प्रचारक गोरखनाथ वेताळ हे करणार आहेत. तरी या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महामानव विचार प्रबोधन समितीचे जीवन सुरडे, पी .एस निकम, अमोल सोनवणे, अशोक दिवे, एड. अण्णासाहेब मोहन , मुश्ताक तांबोळी, फ्रान्सिस शेळके, राजेंद्र हिवाळे, डॉ. हमीद शेख, एम. एम. पठाण, रियाज पेंटर  व रवी बोर्डे आदींनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत