श्रीरामपूरमध्ये मतदार जागृतीसाठी राबविली स्वाक्षरी मोहीम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपूरमध्ये मतदार जागृतीसाठी राबविली स्वाक्षरी मोहीम

श्रीरामपूर(वेबटीम) लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव समजल्या जाणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी देशभरात मध्यावर आली असून मतदानाची टक्क...

श्रीरामपूर(वेबटीम)



लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव समजल्या जाणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी देशभरात मध्यावर आली असून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी श्रीरामपूरच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडून ‘स्वीप’ विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. 

त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी (दि. २३) हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून श्रीरामपूर नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक वाचनालयासमोरील आझाद मैदानात ‘मी मतदान करणार, माझे मत माझे भविष्य’ या धर्तीवर मतदारांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी ३८ शिर्डी (अ.जा) लोकसभा मतदारसंघ अंतर्गत २२० श्रीरामपूर (अ.जा) विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदारांमध्ये प्रबोधन करण्यात आले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आल्याने यास विशेषतः नवमतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

मतदारांमध्ये जागृती वाढावी यासाठी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप नोडल अधिकारी गणेश पिंगळे व त्याची टीम सर्व शाळा, महाविद्यालयात मतदार जागृती सप्ताह राबविला आहे. यामध्ये वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य, रांगोळी, चित्रकला, पथनाट्ये आदी विविध स्पर्धा राबविण्यात येत आहेत. तसेच श्रीरामपूर तालुक्यात प्रत्येक पेट्रोल पंप, चौक, वर्दळीच्या ठिकाणी मतदारांमध्ये जागृती वाढावी यासाठी फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत. तरी सर्व मतदारांनी येत्या १३ मे रोजी श्रीरामपूर मतदारसंघात आपल्या मतदान केंद्रावर जाऊन कोणत्याही आमिषाला बळी न पडता लोकशाही बळकट करण्यासाठी  मताधिकार बजावून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, स्वीप नोडल अधिकारी गणेश पिंगळे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत